• १०१ मोबाईलसह कार जप्त
  • १४ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत : आरोपी तेलंगणाचा

संकेश्वर / वार्ताहर

संकेश्वर पोलिसांनी आंतरराज्य पातळीवरील मोबाईल चोराला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीकडून लाखो रुपयांचे मोबाईल आणि कार जप्त करण्यात आली आहे. संकेश्वर पोलिसांनी कारवाई करत तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील बानसवाडा येथील नवीन संपत या चोराला अटक केली आहे. संशयित आरोपीच्या कारमधून विविध कंपन्यांचे एकूण १०१ मोबाईल फोन आणि एक कार असा एकूण १४.७१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

संकेश्वर पोलिसांनी हिरण्यकेशी कारखान्याजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना, एका संशयित वाहनात विविध मोबाईल आढळून आले. चौकशीदरम्यान ही मोबाईल चोरीची प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून ११.७१ लाख रुपये किमतीचे मोबाईल आणि ३ लाख रुपये किमतीची हुंडाई कंपनीची कार पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. ही कारवाई गोकाकचे डीएसपी रवी नायक आणि संकेश्वरचे सीपीआय शिवशरण अवजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पीएसआय आर. एस. खोत, पीएसआय ए.के. सोनद, तसेच कर्मचारी एस. एल. गलातगी, एस.ए. कांबळे, व्ही.बी. मुरकीभावी, एस. एम. यक्संबी, बी.टी. पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या कामगिरीबद्दल बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.