• पाटीलमळा येथील घटना

बेळगाव / प्रतिनिधी

संपत्तीच्या घरगुती वादातून पुतण्याने स्वतःच्या काकाचा जांबीयाने भोसकून खून केल्याची घटना शहरातील पाटील मळ्यात बुधवारी रात्री 10 : 15 वाजताच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

अनिल शरद धामणेकर (वय ४६) असे या चाकू हल्ल्यात ठार झालेल्या मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान त्यांचा पुतण्या आदित्य धामणेकर याच्याबरोबर जोरदार बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन आदित्यने अनिल यांच्या पोटात जांबीयाने सपासप वार केले. या हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत अनिल यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री साडेबाराच्या दरम्यान अनिल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खडेबाजार पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.