बेळगाव / प्रतिनिधी

श्री गुरू आप्पासाहेब भानुदास वास्कर महाराज व सदगुरू विवेकांनद ज्ञानेश्वर वास्कर महाराज पंढपूर यांच्या कृपा आशीर्वादाने दिंडी सोहळा शुक्रवार  दि. २० सकाळी ९ वाजता मारुती मंदिर, मारुती गल्ली येथून निघणार आहे. तरी भाविकांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, तसेच दिंडीमध्ये प्रवेश करणाऱ्या भाविकांनी येताना तांब्या, ताट, वाटी, अंथरूण व टाळ-जोड घेऊन यावे. अधिक माहितीसाठी यल्लाप्पा गिरमल महाराज यांच्याशी संपर्क साधावा.