बेळगाव / प्रतिनिधी

समाजमाध्यमांवर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका संशयिताला रविवारी अटक करण्यात आली आहे. आणखीन दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संतिबस्तवाड येथे धर्मग्रंथ जळल्याच्या घटनेनंतर वादाची ठिणगी पडली होती. धर्मग्रंथ जळाल्याच्या आरोपावरून राणी चन्नमा चौकात नुकतेच आंदोलन झाले होते. या आंदोलनाचे व्हिडिओ आणि छायाचित्र एकाने समाज माध्यमावर अपलोड केले. यावर दुसऱ्याने वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्याने वाद अधिक चिघळला. या प्रकारामुळे समाजात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून गुन्हा दाखल केला आहे.