बेळगाव : बेळगावातील लोकमान्य रंगमंदिर येथे उमेश कामत व प्रिया बापट, आशुतोष गोखले व पल्लवी अजय या मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकारांच्या ” जर तर ची गोष्ट” या नाटकाचा आज २१७ वा प्रयोग संप्पन झाला. त्यावेळी बेळगाव मधील चित्रपट निर्मिती संस्था अस्मिता क्रिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष व निर्माता श्री राजेश लोहार व लेखक दिग्दर्शक संतोष सुतार व सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी यांनी या कलाकारांची सदिच्छा भेट घेतली.
अस्मिता क्रिएशन्सच्या बेळगाव मधील कार्याचे उमेश कामत व प्रिया बापट यांनी भरभरून कौतुक केले. अस्मिता क्रिएशन याप्रकारे बेळगाव मधील कलाकारांसाठी अभिनय प्रशिक्षण शिबिर घेत आहेत व चांगल्या उदयोन्मुख कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी देऊन जे मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे तसेच त्यांनी अस्मिता क्रिएशन्स च्या पुढील “अन्विता’ या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.