बेळगाव / प्रतिनिधी
खानापूर रोड, आर.पी.डी. चौक दुसरा क्रॉस येथे मागील काही वर्षापासून पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबत आहे. रस्त्याला दोन्ही बाजूला गटार नसल्याने भाग्यनगर वरून आलेले सर्व पाणी याठिकाणी तुंबते, थोडा जरी पाऊस झाला तरी ही समस्या निर्माण होते. याची वेळोवेळी तक्रार केल्यानंतर मागील महिन्यापूर्वी येथील रस्त्याच्या निम्या भागाचे पेवर्स बदलण्यात आले. आता हे काम होऊन महिना सुद्धा उलटला नाही तेव्हा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे हा भाग बेळगावच्या उपमहापौरांचा वार्ड मध्ये येत असल्याने त्यांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नेहमीच साचलेल्या पाण्यातून वाहचालकाना वाट काढावी लागते. तर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण बनते आहे. तसेच याचा परिणाम या भागातील व्यापारावर होत आहे त्यामुळे व्यापारी सुद्धा त्रस्त झाले आहेत.