बेंगळूर : राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक तथा बेळगावचे आयजीपी म्हणून सेवा बजावलेले ओम प्रकाश (वय ६८) यांची हत्या करण्यात आली आहे. ओमप्रकाश यांचा म्रुतदेह बंगळुरूमधील त्यांच्या एचएसआर लेआउट निवासस्थानी रक्ताच्या थारोळ्यात सापडला आहे. ओमप्रकाश हे १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. १ मार्च २०१५ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. तत्पूर्वी होम गार्डचे कमांडंट जनरल, नागरी संरक्षण संचालक आणि अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा महासंचालक, बळ्ळारीच्या हरपनहल्ली उपविभागाचे एएसपी म्हणून त्यांनी काम केले होते. नंतर, त्यांना राज्य दक्षता आयोगाचे एसपी आणि कर्नाटक लोकायुक्त आणि चिक्कमंगळुरू, शिमोगा आणि उत्तर कन्नड जिल्ह्याचे एसपी म्हणून बढती देण्यात आली. बेळगावातही त्यांनी सेवा बजावली होती.
ओमप्रकाश यांना त्यांच्या पत्नीनेच मारल्याचा संशय आहे. ओमप्रकाश यांच्या पत्नीने मानसिक अस्वास्थामुळे त्यांची करून पोलिसांना माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाब उघडकीस येताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. ओमप्रकाश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सेंट्रन्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.