बेळगाव / प्रतिनिधी

भरधाव जाणारा ट्रक रस्त्यावर आलेल्या झाडाच्या फांदीला आदळल्याने ट्रकची केबिन मोडून नुकसान झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी अलारवाड ब्रिज दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर घडली. ट्रक चालकाला शेजारील झाडाच्या फांदीचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली. या घटनेत कोणाला दुखापत झाली नसली तरी महामार्ग प्राधिकरणाने या पद्धतीने रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच आगामी मान्सून सुरू होण्यापूर्वी गंभीर अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्यावर आलेल्या धोकादायक फांद्या छाटाव्यात, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.