- समाजाचे नेत्यांकडून स्वागत
विजयपूर / दीपक शिंत्रे
कर्नाटक राज्यामध्ये राहणाऱ्या आदिबनजिग समाजाला राज्य सरकारच्या मागासवर्ग आयोगाने जाती जनगणना यादीत 3बी गटात समाविष्ट करून सरकारला अहवाल सादर केला आहे, हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे त्याबद्दल समाजाचे राज्य नेते सुरेश गच्चिनकट्टी, जिल्हाध्यक्ष सोमनिंग कटावी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याचे स्वागत केले आहे.
या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी सांगितले की, विजयपूर जिल्ह्यातील आदिबनजिग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने प्रयत्न केल्यामुळे शासनाने जाती यादीत आदिबनजिग समाजाचा समावेश केला आहे. अनेक दशके मागासवर्ग आयोगामार्फत राज्याच्या गॅझेटमध्ये आदिबनजिग समाजाचा समावेश करण्यासाठी सरकारकडे मागणी केली जात होती.
मुख्यमंत्री सिद्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि विशेषतः कायदा मंत्री एच. के. पाटील यांना दिलेल्या निवेदने आणि थेट भेटींमुळे, तसेच आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्य समाजाचा 3बी गटात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले.
विजयपूर जिल्ह्यातील आदिबनजिग समाजाच्या संघर्षाला मिळालेल्या या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, बेळगाव अधिवेशनात आणि विविध वेळा जिल्हा संघटनेच्यावतीने सरकारला दिलेल्या निवेदने, सर्वांच्या सहकार्यामुळे समाजाचे नाव जाती यादीत सामील होऊ शकले.
तसेच, त्यांनी समाजातील लोकांना पुढे मुलांच्या शालेय दाखल्यामध्ये जात या कॉलममध्ये “आदिबनजिग” असे स्पष्टपणे नमूद करण्याचे आवाहन केले. राज्य सरकारकडून अधिकृत गॅझेट प्रसिद्ध होताच, संपूर्ण समाजाने आपल्या मुलांच्या शालेय दाखल्यात “आदिबनजिग” ही जात नमूद करावी, अशी त्यांनी विनंती केली आहे.
यावेळी सुरेश परगोंडे, बसलिंगप्पा कपाळे, गंगाधर संभाण्णी, धर्मराय ममदापूर, मल्लिकार्जुन बिज्जरगी, परशुराम चिंचली, विठ्ठल किरसूर, शिवानंद इंचगेरी, अशोक बालगाववी आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.