बेंगळूर : बेकायदेशीर मालमत्तांच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्त पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून तपासणी केली आहे. या धाडसत्रामुळे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. बेंगळुरूमध्ये १२ ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. लोकायुक्तांनी तुमकुरमधील ७, बेंगळुरू ग्रामीणमधील ८, यादगीरमधील ५, मंगळुरू मधील ४ आणि विजयपूर मधील ४ ठिकाणी छापे टाकले. मागील महिन्यात देखील अशाच प्रकारे धाडसत्र राबवून बेळगावसह अन्य ठिकाणी अधिकाऱ्यांवर बडगा उगारण्यात आला होता.