विजयपूर / दिपक शिंत्रे
कट्टर हिंदुत्ववादी आणि लोकप्रिय आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांची भाजप पक्षातून निलंबित केल्याच्या विरोधात हिंदू संघटना, हितचिंतक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शहरातील तोरवी रोडवरील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात येथे जोरदार निदर्शने केली.
त्यांनी येडियुरप्पा आणि विजयेंद्र यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, त्यांच्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी त्यांनी बसवनगौडा यांची हकालपट्टी केली असल्याचे आरोप केला
महानगर पालिका सदस्य राजशेखर कुरियवर म्हणाले की, येडियुरप्पा आणि विजयेंद्र यांचा कौटुंबिक राजकारण आणि भ्रष्टाचाराला विरोध करणे, तडजोडीचे राजकारण करणे याविरुद्ध त्यांनी आवाज उठल्यामुळे त्यांची भाजप पक्षातून निलंबित करण्यात आले हा हिंदू समाजाचा अपमान आहे. या चुकीच्या निर्णयामुळे भाजप पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. नेहमी हिंदुत्व आणि हिंदूंच्या बाजूने उभे राहणाऱ्या नेत्याला पक्षातून काढून टाकले तर कार्यकर्त्यांना काय संदेश जातो? पक्ष आणि हिंदूत्व टिकवण्यासाठी आणि हिंदू कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी त्यांना तातडीने पक्षात परत घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
प्रभाग क्रमांक 35 चे नेते महंतगौडा पाटील, श्रीशैल बुक्कानी, चंद्रशेखर पतंगी, सदाशिव दाश्याळ, आय. बी. पाटील, अंजू उटगी, सिद्धनगौडा बिरादर, मल्लू हिप्परगी, बसवराज वंतगोडी, सुस्मिता वंडकार, रमेश राठोड भाजप नगर मंडळाचे माजी अध्यक्ष शंकर हुगार, चंद्रशेखर रुद्रगौडा, प्रकाश कदम, कल्लय्या मठपती यांच्यासह अनेक ज्येष्ठ , तरुण कार्यकर्ते, समर्थक सहभागी झाले होते.