- भारताच्या विनंतीनंतर बेलजियम पोलिसांची कारवाई
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारा कर्जबुडव्या मेहुल चोक्सी याला शनिवारी बेल्जियम पोलिसांनी सीबीआयच्या विनंतीवरुन अटक केली आहे. मेहुल चोक्सी हा हिरे व्यापारी होता. कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे. तसेच ईडी आणि सीबीआयने त्याला वाँटेड जाहीर केले होते. आता त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.