बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या आणि जायंटस ग्रुप ऑफ परिवार बेलगाम, वेणुग्राम मल्टीपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटी, साई स्पोर्ट्स ॲकॅडमी बेलगाम यांच्यावतीने “पाणी वाचवा जीवन वाचवा” स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये वय वर्ष ३ ते २५ वर्षाच्या ३५० स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता.
या स्केटिंग रॅलीची सुरुवात गोवावेस स्विमिंग पूल पासून बेळगाव शहराचे प्रथम नागरिक व महापौर मंगेश पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी स्केटिंग पटूंना पाणी वाचविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. उद्घाटनप्रसंगी नगरसेवक जयंत जाधव, नितीन जाधव, समाजसेवक राकेश कलघटगी, जायंटस ग्रुप ऑफ परिवारचे अध्यक्ष सचिन केळवेकर, साई स्पोर्ट्सच्या संचालिका राजलक्ष्मी हलगेकर, समाजसेविका भक्ती शिंदे, तानाजी शिंदे, जायंटस ग्रुपचे श्री त्रिवेदी, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.