गोकाक / वार्ताहर
बस आणि लॉरी यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार, तर पंधराहून अधिक जण जखमी झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बेनचिनमर्डी (ता. गोकाक) गावानजीक घडली. अपघाताची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याबरोबरच मदत कार्य हाती घेतले. याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.