- अथणी तालुक्यातील घटना
अथणी / वार्ताहर
ओढा ओलांडताना दोन मुले आणि एका बैलाचा बुडून मृत्यू झाला. अथणी तालुक्यातील संबरगी गावात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. दीपक संजय कांबळे (वय ९ वर्षे) आणि गणेश संजय कांबळे (वय ७ वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत.ते वडिलांसोबत संबरगी गावापासून नागनूर पी. गावाकडे बैलगाडीतून जात असताना अग्रणी खंदकात पाण्यामुळे वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या वेदांत संजय कांबळे या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अथणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.