बेळगाव / प्रतिनिधी
न्यू गुडशेड रोड येथे असलेले एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र तो अयशस्वी ठरला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. न्यू गुडशेड रोडवरील व्यापारी संकुलात असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. पहाटेच्या वेळी संचार करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांची वर्दळ लक्षात येताच चोरट्यांनी पळ त्यामुळे त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. मागील काही दिवसांपूर्वी सांबरा येथे एटीएम फोडून चोरी करण्यात आली होती. चोरट्यांनी शहरात एटीएम केंद्रे लक्ष बनवले असल्याचे दिसून येत आहे.