नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहे. त्यामुळे नागरिकाना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी मान्सून भारतात कधी येणार, याची उत्सुकता लागली आहे. केरळ हे राज्य भारतातील मान्सूनचे २०२५ प्रवेशद्वार आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर देशभरात र्सवत्र पसरत जातो. त्यामुळे मान्सून केरळात कधी दाखल होणार,याची सवांना उत्सुकता असले. यंदा मान्सून नेहमीपेक्षा आधी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील चार-पाच दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता मान्सून कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज आहे.
लक्षद्वीप क्षेत्राचा काही भाग, केरळ, तामिळनाडूचा काही भाग दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. २७ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला होता. मात्र, पाऊस केरळमध्ये दाखल होईल अशी चिन्हे दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्याच्या विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. १७ मे पासून २५ मे पर्यंतपूर्व मोसमी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. हा पाऊस दोन दोन दिवसांच्या अंतराने कोसळणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी मशागतीला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि वर्दिभात पावसाचा जोर अधिक असेल. शेतकऱ्यांनी ३० मेर्पयंत आपली शेतजमीन मशागत करून तयार ठेवावी, असा सल्लाही दिला आहे. मान्सून केरळमध्ये २५ ते २७ मेर्पयंत दाखल झाल्यास त्यानंतर आठवडाभराच्या अवधीत कोकणात मान्सूनचे आगमन होईल.