विजयपूर / दिपक शिंत्रे
बसवनगौडा पाटील यत्नाळ यतनाळ यांचे आव्हान स्वीकारून मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी स्वाक्षरी केलेले रिकामे पत्र देतो, तुम्हीच त्यात मजकूर भरून सभापतींना द्या,” असे आव्हान वस्त्र, साखर, ऊस विकास आणि कृषी बाजार समिती मंत्री शिवानंद पाटील यांनी दिले आहे.
मंगळवारी विजयपूर शहरातील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, “राजीनाम्याच्या पत्रावर मी फक्त स्वाक्षरी करतो, यतनाळ देखील आमदारकीचा राजीनामा द्यावा. दोघांचेही राजीनामे सभापतींना त्याच वेळेस सादर करावेत. सभापती इच्छित असल्यास आधी माझा राजीनामा स्वीकारावा आणि नंतर बसवनगौडा पाटील यत्नाळ यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा.
शिवानंद पाटील म्हणाले की, “सार्वजनिकरित्या वापरण्यास अपशब्द वापरून आव्हान दिले ते यतनाळ यांनी, मी नव्हे. मी राजीनामा देऊन माझा हेतू स्पष्ट केला आहे. मी यतनाळ यांचे आव्हान स्वीकारले असून मी अजूनही राजीनाम्यास तयार आहे. यतनाळ देखील राजीनामा द्यावा. मी अट घालून राजीनामा दिला आहे.”बसवनगौडा पाटील यतनाळ हे हताश होऊन संयम हरपून पुन्हा पुन्हा असं बोलतात. सार्वजनिक जीवनात अशी आव्हानं दिली की, त्यांचा स्वीकार करून पुढे जावं लागतं, अन्यथा गप्प बसावं,” असेही त्यांनी म्हटले.