• न्यू गांधीनगर परिसरातील घटना

बेळगाव / प्रतिनिधी

अंतर्गत ड्रेनेज पाईपलाईनच्या कामादरम्यान माती कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. बेळगावच्या न्यू गांधीनगर परिसरात बुधवारी ही घटना घडली. बसराज सरवी (वय ३८) आणि शिवलिंग सरवी (वय २०) दोघेही रा. पटगुंडी ता. मुडलगी अशी मृतांची नावे आहेत.

कर्नाटक राज्य पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागातर्फे या भागात बुधवारी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी बसवराज सरवी आणि शिवलिंग सरवी हे पाईप टाकण्यासाठी खणलेल्या चरित करून काम करत होते. यावेळी अचानक माती कोसळली आणि त्या मातीखाली दोघेही कामगार गाढले गेले.

यानंतर घटनास्थळी उपस्थित इतर कामगार आणि स्थानिक नागरिकांनी कामगारांना मातीच्या ढिगार्‍याखाली खालून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही.काही वेळातच जेसीबीच्या साह्याने माती बाजूला करण्यात आली आणि दोघांना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीचं, त्यांचा मृत्यू झाला होता.दरम्यान घटनेची माहिती मिळताच माळ मारुती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बघ्यांची गर्दी हटवली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.