नवी दिल्ली : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एका फर्टिलिटी क्लिनिकबाहेर बॉम्बस्फोट झालाय. यात एकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. एफबीआयने हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.

हा स्फोट पाम स्प्रिंग्स शहरातील डाऊनटाऊनमध्ये झाला आहे. यात क्लिनिकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की परिसरातील इमारतींच्या खिडक्या आणि दरवाजांच्या काचा फुटल्या आहेत.

शहर पोलीस प्रमुखांच्या सांगण्यानुसार, हा स्फोट घडवून आणला असल्याचे दिसून येत आहे. तर एफबीआयच्या लॉस एंजिलिसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्लिनिकला जाणीवपूर्वक टार्गेट केले गेले आहे . दरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा निष्कर्ष कसा काढला याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.