बेळगाव / प्रतिनिधी

मार्कंडेय साखरकारखान्याच्या उपाध्यक्षपदासाठी १६ जून रोजी निवडणूक होणार आहे. उपाध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे सहकार खात्याच्या आदेशानुसार निवडणूक घेतली जाणार आहे. मार्कंडेय साखर कारखान्याच्या चेअरमन पदावर आर. आय. पाटील यांची निवड झाल्यानंतर उपाध्यक्षपद रिक्त झाले आहे. सहकार खात्याने चार दिवसांपूर्वी व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. यानुसार, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जी. आउल्ला यांनी सर्व संचालकांना नोटीस देऊन १६ जून रोजी कारखान्यात उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याचे कळवले आहे.

सर्व संचालकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. संचालक मंडळात उपाध्यक्षपदासाठी स्वच्छ चरित्र असलेल्या आणि भ्रष्टाचारापासून दूर असलेल्या उमेदवारांची निवड व्हावी, अशी चर्चा आहे. तसेच, महिला संचालकांना या पदासाठी संधी देण्याची मागणीही करण्यात येत आहे.