• चोर्ला गावानजीक घटना

खानापूर / प्रतिनिधी

बेळगाव – गोवा मार्गावरील चोर्ला गावानजीक मालवाहू रिक्षा आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. आज शनिवार (दि. ३) मे रोजी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. विक्रम कोळेकर (वय २८ वर्ष) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, विक्रम कोळेकर हा युवक गोवा येथे एका बँकेत कामाला होता. शिवजयंतीच्या निमित्ताने तो गावाकडे दोन दिवस रजेवर आला होता. आपल्या घरातील सर्व कामे आटोपून तो आज शनिवारी सकाळी ७ वा. सुमारास दुचाकीवरून गोव्याला जात होता. त्यावेळी चोर्ला नजीक हा अपघात घडला आहे.

या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.