रायबाग / वार्ताहर
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ढोंगी स्वामी लोकेश्वर कारागृहात जाताच त्याचा मठ पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला आहे. आरोपी ढोंगी स्वामी लोकेश्वरने अनधिकृतपणे मठ इमारतीचे बांधकाम केले होते. रायबाग तालुक्यातील मेखळी गावातील सर्वे क्रमांक २२५ मधील सरकारी गायरान जमिनीत ८ एकर जागा अतिक्रमित करून ८ वर्षांपूर्वी हा मठ बांधला होता. दरम्यान, अत्याचाराच्या प्रकरणात स्वामीजी तुरुंगात जाताच, रायबाग तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली तीन जेसीबींच्या मदतीने सकाळीच अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.