• कणबर्गी परिसरातील घटना

बेळगाव / प्रतिनिधी

रस्त्यावर गाडी आडवी घालण्याबाबत विचारणा केल्यामुळे वकिलाला मारहाण करण्यात आली. या घटनेत वकील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. राहुल ट्यानगी असे मारहाण झालेल्या वकिलाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, वकील राहुल ट्यानगी हे आपल्या नातेवाईकांसमवेत दुचाकीवरून जात असताना कणबर्गी येथे त्यांच्यासोबत हा प्रकार घडला.गाडी आडवी घातल्याचे निमित्त साधून संशयित नजरेने पाहिल्याने त्याबाबत विचारणा केली असता वाद निर्माण झाला. वकील राहुल ट्यानगी घरात परतल्यानंतर काही वेळाने १५ जणांच्या टोळक्याने त्यांना फोन करून बाहेर बोलावले आणि त्यांच्यावर जोरदार हल्ला केला.

या हल्ल्यात वकील राहुल यांच्या हाताला, चेहऱ्याला आणि दातांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकातगुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.