- बेळगावच्या बीम्स रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू
बेळगाव / प्रतिनिधी
कीटकनाशकाची गोळी खाऊन नवविवाहितेने आत्महत्या केली. इंचल (ता. बैलहोंगल ; जि. बेळगाव) येथे बैलहोंगल पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. लक्ष्मी मंजुनाथ हुगार (वय २२) असे मृत महिलेचे नाव असून ती फुलविक्रीचा व्यवसाय करत होती.
मृत लक्ष्मी, हिने घरात कीटकनाशकाची गोळी खाल्ली होती. यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला प्रथम बैलहोंगल सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
यानंतर कुटुंबियांनी तिला बेळगावच्या बीम्स रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार अयशस्वी झाल्याने लक्ष्मीचा रुग्णालयात मृत्यू झाला. दि. ७ डिसेंबर रोजी लग्न झालेल्या लक्ष्मी या नवविवाहित महिलेने लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यांनंतर आत्महत्या केली आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून पालकांना धक्का बसला आहे.