बेळगाव / प्रतिनिधी

बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ मध्ये जलतरण २०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत अमन सुनगार याने रौप्य पदकाची कमाई केली आहे.अमन हा बेळगावमधील पहिला जलतरणपटू आहे ज्याने वैयक्तिक पदक जिंकले आहे. त्याचे हे यश प्रेरणादायी यश बेळगाव आणि संपूर्ण क्रीडा समुदायासाठी अभिमानाचा क्षण आहे.
अमन सध्या बेंगलुरू येथे डॉल्फिन अ‍ॅक्वॅटिक्स इंडिया येथे प्रसिद्ध प्रशिक्षक निहार अमीन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. हे क्षण स्विमर्स क्लब बेळगावसाठीही अभिमानाचा क्षण आहे, जिथून अमनच्या प्रवासाला सुरुवात झाली. प्रशिक्षक उमेश कलघटगी आणि अक्षय शेरेगार यांचे मार्गदर्शन लाभले होते.