पुणे : येथील खानापूर (बेळगाव) मित्र मंडळाच्यावतीने रविवार दि. ८ जून २०२५ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी – पालक मार्गदर्शन मेळावा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम दुपारी ठीक ३.०० वा. स्व. सुषमा स्वराज बचत गट व प्रशिक्षण केंद्र (विश्वास हॉटेलच्या बाजूला), नवले ब्रीज जवळ वडगाव (खु.) पुणे येथे होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय पाटील हे असणार आहेत. तर मंडळाचे सहखजिनदार श्री. नारायण गावडे हे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष पद भूषवणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हूणन डॉ. संदीप साळवी (सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ, संचालक पल्मोकेअर रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन) उपस्थित राहणार आहेत. तर ॲड. एन. डी. पाटील (प्रमुख जिल्हा सरकारी वकील), श्री. सोमनाथ पाटील (मॅनेजर, दुबई इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर ऑथॉरिटी, दुबई अँड यूएई) व डॉ. शीतल पाटील (निष्णात स्त्री रोगतज्ञ) हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत.
तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. तसेच १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या प्रमाणपत्राच्या प्रतीसह दि. ७ जून २०२५ पर्यंत शीतल तवर – ९३२५४५४८२८ , सुमेधा सुळकर – ८९८३६६१९३५ , ज्योती गुरव – ७४९९०९५५०५, नारायण गावडे – ९८५०१८८३४९ यांच्याकडे नावे नोंदवावीत असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.