खानापूर / प्रतिनिधी
कौंदल (ता. खानापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते व करंबळ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते उदय भोसले (वय ४२ वर्षं) यांचा अपघाती मृत्यू झाला. खानापूर बेळगाव मार्गावरील देसूर पुलावर अज्ञात कारचालकाने उदय भोसले यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने उदय भोसले जागीच गतप्राण झाले.
याबाबत प्राप्त माहितीनुसार उदय भोसले कामानिमित्त मित्रासोबत बेळगावला गेले होते. काम आटोपून खानापूरला परतत असताना आज सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. तसेच त्यांच्यासोबत असलेला प्रशांत पाटील (वय ४२ वर्षं) (भारतीय सेना) गंभीर जखमी झाला असून दुचाकीला पाठीमागून धडक देऊन कार चालक फरार झाल्याचे समजते.