बेंगळूर : नव्या शैक्षणिक वर्षाला कर्नाटक राज्यात आज गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी शिक्षक शाळेत हजेरी लावतील तर दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थी दाखल होण्यास सुरुवात होईल.
यावर्षी शिक्षण खात्याने पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण केली आहे. नव्या शैक्षणिक वर्षात अतिथी शिक्षकांच्या किती जागा भरती केल्या जाणार आहेत याची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अतिथी शिक्षकांची भरती लवकर सोडण्याचे शक्यता आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रारंभोत्सव साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.