खानापूर / प्रतिनिधी
कणकुंबी (ता. खानापूर) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेची स्थापना होऊन १२९ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव कार्यक्रम १५ एप्रिल रोजी तीन सत्रात साजरा करण्यात येणार आहे.
पहिल्या सत्रात सकाळी ९ वा. गावातून ग्रंथदिंडी, त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत, ईशस्तवन व स्वागतगीत, दीपप्रज्वलन, फोटोपूजन, प्रास्ताविक व स्वागत, पाहुण्यांचा सत्कार, पाहुण्यांचे मनोगत, प्रमुख वक्त्यांचे मनोगत, वर्ग खोलीचे उद्घाटन, नवीन वर्ग खोलीचे भूमिपूजन असे कार्यक्रम होणार आहेत. दुपारी १ ते ३ पर्यंत भोजन विश्रांती असणार आहे.
दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वा. आजी – माजी शिक्षक, आजी – माजी अतिथी शिक्षक, माजी विद्यार्थी संघ आणि शाळा सुधारणा समितीचा सत्कार, माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थांचे मनोगत, आभार प्रदर्शन, समुह फोटो सेशन आणि वंदे मातरम होणार आहे.
तिसऱ्या सत्रात रात्री ०७.३० वा.शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, माजी विद्यार्थी यांचाकडून करमणुक कार्यक्रम, देणगीदारांचा सत्कार समारंभ, रात्री ठीक ९.३० वा शाहीर अभिजित कालेकर (लोककलाकार खानापूर) यांचा पोवाडा कार्यक्रम होईल.
कार्यक्रमाला श्री विश्वेश्वर हेगडे कागेरी (खासदार उत्तर कन्नड), श्री. सतीश जारकीहोळी (पालकमंत्री बेळगांव), सौ. लक्ष्मी हेब्बाळकर (महिला व बालकल्याण मंत्री कर्नाटक राज्य) श्री. विठ्ठलराव हलगेकर (आमदार खानापूर तालुका) श्री. प्रकाश आण्णा हुक्केरी (विधान परिषद, सदस्य), श्री. किरण ठाकुर (संस्थापक, लोकमान्य मल्टी पर्पज को -ऑफ सो.), श्री. बबन दळवी (अध्यक्ष, श्री माऊलीदेवी विश्वस्थ मंडळ, कणकुंबी), श्री. चन्नराज हट्टीहोळी (विधान परिषद, सदस्य) श्री. लखन जारकीहोळी (विधान परिषद, सदस्य) श्री. अरविंद चंद्रकांत पाटील (माजी आमदार खानापुर तालुका) श्री. अनिल बेनके (माजी आमदार, उपाध्यक्ष, भाजपा कर्नाटक, राज्य) श्रीमती. लिलावती हिरेमठ (DDPI बेळगांव) श्री. पी. रामप्पा (BEO खानापूर), सौ.अंजलीताई हेमंत निंबाळकर (माजी आमदार, खानापूर तालुका), सौ. दिप्ती दिलीप गवस (अध्यक्ष ग्राम पंचायत कणकुंबी) श्री. उमेश फटू गावडे (अध्यक्ष SDMC कमिटी कणकुंबी), श्री. किरण गावडे (संचालक लोककल्प फौंडेशन),श्री. साईप्रसाद सडेकर (पावणी इंडस्ट्रीज् बेळगांव), श्री. परशुरामभाऊ नंदीहळ्ळी (माजी आमदार, संस्थापक, विश्व भारत सेवा समिती) श्री. दिगंबर पाटील (माजी आमदार, खानापुर) श्री. विष्णु महादेव नाईक (माऊली सर्व्हिसेस मुंबई) , श्री. प्रकाश बाबली गावडे (चिखले) व विविध स्तरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
हलकर्णी (ता.चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत भगवंत पॊतदार प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. गावातील प्रमुख पंच श्री. राजाराम लक्ष्मण गावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
या शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त माजी विद्यार्थी संघटनेमार्फत शाळेमध्ये आठ लाखांची विविध आम्ही करण्यात आली आहेत. यामध्ये इमारत दुरुस्ती, रंगकाम, नवीन स्टेज बांधण्यात आले आहे. सदर शाळा खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील एकमेव शाळा आहे, ज्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
या शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रमाला सर्व आजी-माजी शिक्षक, या भागातील सर्व शिक्षणप्रेमी, पालक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक, एसडीएमसी कमिटी व माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.