- बेळगावमध्ये बहुउद्देशीय कलादालन आणि व्यापारी संकुलाचे उद्घाटन
बेळगाव / प्रतिनिधी
स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत बेळगावमध्ये बहुउद्देशीय कलादालन आणि व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. यामुळे रोजगार आणि महसुली उत्पन्न निर्माण होईल. दुकानांच्या लिलावातून मिळणाऱ्या रकमेचा वापर शहराच्या विकासासाठी करावा, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
रविवार दि. २० एप्रिल रोजी स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत २.६२ एकर क्षेत्रावर ४७.८३ रुपये खर्चून बांधलेल्या टिळकवाडी येथील आधुनिक सुविधांसह बहुमजली व्यापारी संकुल आणि कलामंदिराचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, कला मंदिरची योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीत राबविण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येकी ५०% निधी उपलब्ध करून दिला आहे. बेळगाव शहरातील काही उर्वरित कामे काही दिवसांत पूर्ण होतील आणि त्यांचे उद्घाटन होईल, असे त्यांनी सांगितले.
मागील सरकारच्या काळात सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कंत्राटदारांऐवजी थेट भरतीद्वारे किमान १७,००० रुपये वेतन दिले जात आहे. याशिवाय, चालक आणि सफाई कामगारांना किमान वेतन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहेत. सर्व दिव्यांगांना तीनचाकी वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- हलगा एसटीपी (सांडपाणी) प्रकल्पासाठी अधिक मोबदला :
हलगा सांडपाणी सेवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी अधिक जमीन संपादन करण्यात आली आहे त्यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी देण्यासाठी संबंधित फाइल तपासून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यात एकूण ६,९२८ कोटी रुपयांच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे, त्यापैकी ३,५०० कोटी रुपये राज्याचा वाटा आहे. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जोर देत सांगितले.
राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी एकूण ६९२८ कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत, त्यापैकी ३५०० कोटी रुपये राज्याचा वाटा आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार वचनबद्ध आहे.
तत्पूर्वी बोलताना, नगरविकास मंत्री भैरती सुरेश म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राज्य आणि केंद्र सरकारमधील भागीदारीत अत्याधुनिक कलामंदिर आणि व्यापारी संकुलाची स्थापना करण्यात आली आहे. उत्तर कर्नाटकातील हे एक सुसज्ज व्यावसायिक संकुल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, नगरविकास मंत्री सुरेश भैरती आदी आमदार उपस्थित होते.