सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं.) येथे नवीन बांधण्यात येत असलेल्या श्री ज्योतिबा व श्री काळभैरव मंदिराचा कॉलमभरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. गावातील महिला रोजगार गटाने आपल्या रोजगारामधील मिळणाऱ्या पगारामधील बचत केलेली रक्कम या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी म्हणून ५१ हजार रुपयांची देणगी दिल्याने गावातून अभिनंदन करण्यात येत आहे. महिलांच्या उपस्थितीत कॉलमभरणी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला रोजगार गटाच्या प्रमुख सुरेखा राजू पाटील होत्या.
यावेळी विविध फोटो पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला ग्राम सुधारणा कमिटी अध्यक्ष परशराम पाटील, देवस्की पंचकमिटी सदस्य टोप्पाणा पाटील, नागेश चौगुले, परशराम पाटील उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी महिला रोजगार गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आम्हा सर्व महिलांचा या मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक हातभार लागावा याच उद्देशाने ५१ हजार रुपयांची देणगी देत असल्याचे मत रोजगार गटाच्या प्रमुख सुरेखा पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार ज्योतिर्लिंग देवस्थान सेवा संघाचे सेक्रेटरी विक्रम जोतिबा जाधव यांनी केले.