बेळगाव / प्रतिनिधी

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नगरविकास प्राधिकरणे/नियोजन प्राधिकरणे /नगरपालिका नियोजन प्राधिकरणांकडून तलावांच्या पुनरुज्जीवनाची कामे जलद आणि सुरळीतपणे हाती घेता यावीत, तसेच तलावांच्या विकासाशी संबंधित विविध विभाग / मंडळांनी द्यावयाची ना – हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) विहित मुदतीत एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘एक खिडकी’ समितीची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि संबंधित विभागांमधील समन्वय वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यामुळे तलाव विकासाच्या कामांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर होऊन ती अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.