बेळगाव / प्रतिनिधी
हक्कपत्र वितरण ही योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, पुढील महिन्यात होस्पेट येथे मुख्यमंत्री स्वतः हक्कपत्रांचे वितरण करणार असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली. हक्कपत्र वितरण ही योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, जिथे जिथे महसूल गावे व उपगावे स्थापन करण्यात आले आहेत, पुढील महिन्यात म्हणजे १५ ते २० तारखेच्या दरम्यान विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट येथे मुख्यमंत्री यांच्याहस्ते समारंभपूर्वक हक्कपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाही हक्कपत्रे दिली जातील. त्याचबरोबर महसूल ग्रामांतील १,७०० प्रलंबित हक्कपत्रांचे वाटपदेखील एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.