विजयपूर / दिपक शिंत्रे

चालकाचा नियंत्रण सुटून कार झाडाला धडकून पलटी झाल्यामुळे तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दुपारी हगडिहाळ क्रॉस जवळ घडली आहे. बसवण बागेवडी तालुक्यातील उक्कली येथून विजयपूरकडे येत असताना झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. उत्तणाळ गावातील बीरप्पा गोडेकर (वय ३०), हनुमंत कडलीमट्टि (वय २५), आणि जुमणाळ गावातील यमणप्पा नाटिकर (वय २८) हे मृत्यूमुखी पडले आहेत. 

जुमणाळ येथील उमेश बजंत्री जखमी झाला असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अतिवेगाने आणि दुर्लक्ष करीत चालविलेल्या कारमुळे अपघात झाला. हगडिहाळ क्रॉस जवळ रस्त्याचा वळण घेण्याचा प्रयत्न करत असताना, कारचे नियंत्रण सुटून ती शेतातील झाडाला धडकली व पलटी झाल्यामुळे हा अपघात घडला आहे विजयपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे.