• शहर गुन्हे शाखेची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

गोव्यातून बेळगावकडे अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या लाखो रुपये किमतीचा दारूसाठा शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

एका खाजगी वाहनातून गोव्याहून बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आणला जात असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी कारवाई करून संशयित वाहनाला घडवून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या. त्या सर्व बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून, जप्त दारूचा संपूर्ण तपशील व आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे. हे दारूचे साठे बेळगाव येथील विविध ठिकाणी वितरित करून टाळ्या बाजारात विक्री करण्याचा उद्देश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.