विजयपूर / दिपक शिंत्रे

बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतन सिंग राठोड, (आयपीएस) यांनी बुधवार दि. १४ मे रोजी विजयपूर जिल्ह्याला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गांधी चौक पोलिस स्थानक, महिला पोलिस स्थानक, सीईएन पोलिस स्थानक, वाहतूक पोलिस स्थानक आणि गोलघुमट पोलिस स्थानक या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कामकाजाची पाहणी केली. गुन्ह्यांच्या तपासाची स्थिती तपासली आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांना जनतेशी अधिक जवळून संपर्क साधण्याचे आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचे निर्देश दिले.

डॉ. राठोड हे २००७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांनी बेंगळुरूतील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे संचालक आणि उपपोलिस आयुक्त म्हणूनही कार्य केले आहे. सध्या ते बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे निरीक्षक जनरल म्हणून कार्यरत आहेत.