बेळगाव : हॉकी बेळगाव तर्फे घेण्यात येणाऱ्या मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ शनिवार दि. २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता लायन्स क्लब ऑफ टिळकवाडीच्या लायन्स भवन येथे होणार आहे.

यावेळी बेळगावचे खासदार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जय भारत फाउंडेशनचे सचिव नंदकुमार तलरेजा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी गुळाप्पा होसमणी व सचिव सुधाकर चाळके राहणार आहेत. उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिरात जिल्ह्यातून 170 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन हॉकी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. सदर शिबीर १ एप्रिल ते २५ मे दरम्यान लेले मैदानावर घेण्यात आले.

समारोप समारंभात क्रीडा खात्याचे उपसंचालक बी श्रीनिवास, मिस्टर इंडिया व एकलव्य अवॉर्ड पुरस्कार विजेते सुनील ऑपटेकर, केलईच्या कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राध्यापक डॉक्टर अनुपकुमार जांबोटी यांचा तसेच हॉकी प्रशिक्षणार्थींचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. असे हॉकी बेळगावतर्फे प्रकाश कालकुंद्रीकर यांनी कळविले आहे.