विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर जिल्ह्याच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या दत्तक संस्था अंतर्गत विशेष गरज असलेल्या एका बालकाला हिमाचल प्रदेशातील एका कुटुंबाने दत्तक घेतले आहे.

विशेष गरज असलेल्या बालकाला दत्तक घेण्यासाठी अर्ज सादर करण्यात आलेल्या पार्श्वभूमीवर, शनिवारी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हिमाचल प्रदेशातील कुटुंबाला मार्गदर्शक तत्त्वांनुसार जिल्हाधिकारी टी. भूबालन यांनी बालकाला कुटुंबाच्या स्वाधीन केले. यावेळी महिला आणि बाल विकास विभागाचे उपसंचालक के. के. चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अनिल हळ्ळी आणि दत्तक संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.