- दुभाजकाला ठोकरून रिक्षा पलटली
बेळगाव / प्रतिनिधी
दुभाजकाला ठोकून ऑटो रिक्षा पलटी झाल्याने गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. बुधवार दि. २ एप्रिल रोजी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा जवळ ही घटना घडली आहे.
मोहम्मदअली शब्बीर अहमद (वय ४५) रा. न्यू गांधीनगर असे त्या दुर्दैवी रिक्षाचालकाचे नाव आहे. धामणे एस. येथील आपल्या सासरवाडीत तो जेवणासाठी गेला होता. जेवण आटोपून बुधवारी रात्री केए २२ एए ४४०७ क्रमांकाच्या ऑटो रिक्षातून बेळगावकडे येताना पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलका जवळ दुभाजकाला धडक बसून रिक्षा तब्बल तीनवेळा पलटी झाली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद अलीला सिव्हिल हॉस्पिटलला हलवताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती समजतात हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.