बेळगाव : हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त काल व आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काल रात्री वारकरी संप्रदाय भजनी मंडळाचे भजन झाले. आज पहाटे हनुमान मूर्तीवर शेकडो भक्तांचे अभिषेक झाल्यानंतर पहाटे ५ वाजल्यापासून ह. भ. प. श्री कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे हनुमान जन्मोत्सवावर प्रवचन झाले. ठीक 6 वाजून 25 मिनिटांनी हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा अनेक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर महिलांच्या भजनाचे कार्यक्रम झाले. घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. दुपारी महाप्रसाद होणार आहे.
April 20, 2026
२६ एप्रिलच्या जंगी मैदानासाठी तयारी सुरू सांबरा : सांबरा कुस्ती कमिटीच्या वतीने गतवर्षी यशस्वीरीत्या पार पडलेल्या कुस्ती आखाड्याचा जमा-खर्च अहवाल हनुमान मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात सादर […]








