बेळगाव : सालाबाद प्रमाणे यंदाही घुमटमाळ मारुती मंदिर ,हिंदवाडी येथे हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता आरती ९.३० वाजेपर्यंत वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.
शनिवार दि १२ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता अभिषेक, पहाटे ५ नंतर ह. भ. प. कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे किर्तन, सूर्योदयाला हनुमान जन्मोत्सव, तीर्थप्रसाद त्यानंतर दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सेक्रेटरी प्रकाश माहेश्वरी व इतर ट्रस्टीज यांनी केले आहे.