- कोल्हापूर सर्कल नजीक घटना
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या कोल्हापूर सर्कल नजीक एका खाजगी रुग्णालयाच्या मागील भागात उभ्या असलेल्या रिक्षाच्या सिलेंडर मधून गॅस गळती झाल्याने अचानक आग लागल्याची घटना आज शुक्रवारी घडली.
गॅस गळतीमुळे संपूर्ण ऑटो रिक्षा जळून खाक झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाणी टाकून आग आटोक्यात आणली. ही घटना बेळगाव उत्तर वाहतूक पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली.