• पोलिसांकडून अवघ्या २४ तासात प्रकरणाचा छडा
  • शिवमोग्गा मधून आरोपीला अटक
  • जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांची माहिती

बेळगाव / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील गाडीकोप गावच्या हद्दीत झालेल्या भीषण हत्येप्रकरणी पोलिसांनी शिवमोग्गा मधून आरोपीला अटक केली, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

खानापूर तालुकाच्या बालोगा गावातील शिवनगौड इरानगौडा पाटील (वय ४७) या इसमाची दगडाने ठेचून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. सदर व्यक्तीचा मृतदेह खानापूर ते एम. के. हुबळी रस्त्यावरील गाडीकोप गावानजीक असणाऱ्या शेतात आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या २४ तासात आरोपीला शिवमोग्गामध्ये अटक केली. शिवनगौडा पाटील हे दास्तीकोप येथे सुरु असलेल्या यात्रेसाठी गेले होते. रात्री परत येत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत.