बेळगाव : भाग्यनगर क्रॉस ६ येथील रहिवासी तथा म. ए समितीच्या कार्यकर्त्या आणि बेळगावच्या माजी महापौर सौ. नीलिमा संभाजी चव्हाण (वय ६०) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती माजी नगरसेवक संभाजीराव चव्हाण, दोन कन्या व एक मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वा. चिदंबरनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इ. स. २००२-२००३ या काळात बेळगावच्या महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध होता.सध्या त्या अहिल्यादेवी सोसायटीच्या चेअरमन होत्या.
June 13, 2025
पावसाला प्रारंभ झाल्याने उपक्रमाला चालना यंदाच्या पावसाळ्यात हिरवळ वाढणार बेळगाव / प्रतिनिधी वनखात्यातर्फे वृक्ष संवर्धनासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षी लाखो […]