- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावकरांच्या बहुप्रतीक्षित धारवाड – कित्तूर – देसूर – बेळगाव थेट रेल्वे सेवेला लवकरच प्रारंभ होणार असून, यासाठी आवश्यक १२०० एकर जमिनीचे केवळ पाच महिन्यात अधिग्रहण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीने राबवले जात असून, या मार्गामुळे आता प्रवाशांना लोंढा मार्गाला वळसा घालण्याची आवश्यकता राहणार नाही. बेळगाव-धारवाड दरम्यान थेट सुपरफास्ट रेल्वेसेवा लवकर सुरु होईल. एक महिन्याच्या आत रेल्वे मंडळाकडून यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.