बेळगाव / प्रतिनिधी
हिडकल धरणाचे पिण्याचे पाणी धारवाड औद्योगिक वसाहतीला न पाठवता त्याऐवजी बेळगाव येथील एसटीपी पुनर्वापरित पाणी पाठवावे, असा सल्ला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आला आहे.
बेळगावच्या नेत्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची बेंगळूर मंत्रिमंडळ निवासस्थानाच्या ठिकाणी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हिडकल धरणाचे पिण्याचे पाणी धारवाड औद्योगिक वसाहतीत पाठवणे थांबवण्याबाबत चर्चा केली. पिण्याच्या पाण्याऐवजी ते बेळगावहून एसटीपी पुनर्वापरित पाणी घेऊ शकतात. जल धोरणात “पुनर्वापरित पाणी औद्योगिक कारणांसाठी वापरले जाऊ शकते” हे नमूद आहे, असे चर्चेप्रसंगी स्पष्ट करण्यात आले.