• गवसे मंडळ अध्यक्षपदी अध्यक्ष विशाल बल्लाळ यांची निवड

चंदगड / लक्ष्मण यादव

चंदगड तालुक्यातील भाजपच्या मंडळ अध्यक्षांची निवडणूक मंगळवार (दि. २२) रोजी संपन्न झाली. प्रामुख्याने माणगाव व गवसे मंडळ अध्यक्ष पदासाठी ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये माणगाव मंडळासाठी दिग्विजय रविंद्र देसाई यांची व गवसे मंडळासाठी विशाल मनोहर बल्लाळ निवड करण्यात आली.

माणगाव मंडळासाठी महेश पाटील यांनी दिग्विजय देसाई यांचे नाव सूचविले, त्याला भरमू मेणसे यांनी अनुमोदन दिले. तर गवसे मंडळासाठी श्रीकांत नेवगे यांनी विशाल बल्लाळ यांचे नाव सुचवले, त्याला अशोक कदम यांनी अनुमोदन दिले. या निवड प्रक्रियेमध्ये सर्वांनी एकमताने या दोन्ही नावांना संमती दर्शवली.

निवड जाहीर होताच भाजपचे चंदगड तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील तसेच आमदार शिवाजीराव पाटील यांनी दोन्ही नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नूतन मंडळ अध्यक्ष दिग्विजय देसाई व विशाल बल्लाळ यांनी भाजप पक्ष संघटना बळकटीसाठी सर्व बुथप्रमुख, शक्ती प्रमुख व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.

या निवड प्रक्रिये दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण देसाई यांनी काम पहिले. यावेळी माजी रोजगार हमी योजना राजमंत्री भरमुअण्णा पाटील, तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, अशोक कदम, प्रताप सूर्यवंशी अनिल शिवणगेकर भावकू गुरव, राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.