बेळगाव : सावरकर रोड येथील प्रतिष्ठित नागरिक सौ. दिपाली दीपक दळवी (वय ७३) यांचे आज शुक्रवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या त्या पत्नी होत. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या अनेक लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या पश्चात पती दीपक दळवी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दिपाली दळवी यांच्यावर सायंकाळी ७.३० वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.