- इतर शैक्षणिक संस्थाप्रमाणे उन्हाळी सुट्टीची मागणी
चंदगड / लक्ष्मण यादव
इतर शैक्षणिक संस्थाप्रमाणे उन्हाळी सुट्टी मिळावी, या मागणीसाठी रविवार (दि. २७) रोजी चंदगड तालुका अंगणवाडी सेविका – मदतनीस संघटनेच्यावतीने आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन स्वीकारून आमदार शिवाजीराव पाटील यांनी याकामी लक्ष घालून सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे , अशी ग्वाही दिली आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांच्यावतीने जिल्हा संघटना प्रतिनिधी आणि अंगणवाडी पतसंस्था संचालिका संगीता पाटील तसेच जिल्हा संघटना प्रितिनिधी कल्पना पिलारे यांच्यासह तालुक्यातील इतर अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.